एनसीसी युवतींचा थरार, उल्हासनदी पात्रात चित्त थरारक नौकानयनाचा अनुभव

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका ग्रामीण हद्दीतील उल्हास नदी दहागाव चौरे परिसरातील नदी पात्रात ठाणे जिल्हा कायाकिंग कनोईंग असोसिएशन, के.जे. सोम्मया कॉलेज ऑफ सायन्स् अँन्ड कॉमर्स एनसीसी युवती पथक विघाविघार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय कायाकिंग व कनोईंग स्पर्धा रविवारी संपन्न झाली.

कल्याण (Kalyan).  ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका ग्रामीण हद्दीतील उल्हास नदी दहागाव चौरे परिसरातील नदी पात्रात ठाणे जिल्हा कायाकिंग कनोईंग असोसिएशन, के.जे. सोम्मया कॉलेज ऑफ सायन्स् अँन्ड कॉमर्स एनसीसी युवती पथक विघाविघार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय कायाकिंग व कनोईंग स्पर्धा रविवारी संपन्न झाली.

उल्हासनदी पात्रात झालेल्या चित्त थरारक नौकानयन स्पर्धेत ४१ युवतींनी सहभाग घेतला. यात नौकानयन प्रशिक्षणांशी सागंड घालत बोट चालविणे तसेच कमीत कमी वेळात अंतर कसे कापेल यांचे प्रशिक्षण संघटनेचे सचिव ‌अजित कारभारी, खजिनदार विनायक कोळी यांनी दिले. पदक विजेत्या युवती खेळाडूंना स्वयम सिद्धी कॉलेज भिवंडीचे प्राचार्य मेजर गोरखनार शिखरे, ठाणे जिल्हा कायाकिंग कनोईंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनिल वायले, लेफ्टनंट डॉ. रोहिणी कसबे, दलजित सिंग खोकर आदींच्याहस्ते प्रमाणपत्र व पदके देऊन गौरवण्यात आले.

ठाणे जिल्हा कायाकिंग कनोईंग असोसिएशनचे पदाधिकारी अजित कारभारी, संतोष मुंडे, विनायक कोळी, सदस्य राजेश भगत, राज वर्मा, किर्ती कुरबेट‌, ‌पुनम कासले, योगिता शिर्के, बाबासाहेब‌ भालेराव, आदित्य यादव, यश वर्मा यांनी कायाकिंग बोट प्रशिक्षणासाठी व पुर विमोचन कसे करावे याचे मार्गदर्शन केले. नौकानयन स्पर्धेत युवतीच्या नौकानयन कौशल्य पुर्वेक चित्त थरारक आदाकारीने उपस्थितांची मने जिकंली.