Municipal Corporation to implement CM City Road Scheme in Thane It will help in developing undeveloped roads

ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीमध्ये विक्रांत चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केला. मुंब्रा येथील नगरसेवक यासीन कुरेशी यांनी, रिक्षा स्टँडच्या आरक्षित भूखंडालगत असलेल्या भूखंडावर निवासी इमारती असतानाही तो भूखंड मोकळा दाखवून रहिवाशांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आपण 2 वर्षे पाठपुरावा करीत असूनही न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहन करु, असा इशारा दिला.

    ठाणे : अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याबाबत सभागृहामध्ये आवाज उठविला की लगेचच काही लोक नगरसेवकांना भेटायला येत असतात. सभागृहातील या चर्चेची ‘टीप’ बेकायदा बांधकामे करणार्‍यांना प्रशासनाकडूनच दिली जात आहे. त्यातूनच दिव्यासारख्या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केला.

    ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीमध्ये विक्रांत चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केला. मुंब्रा येथील नगरसेवक यासीन कुरेशी यांनी, रिक्षा स्टँडच्या आरक्षित भूखंडालगत असलेल्या भूखंडावर निवासी इमारती असतानाही तो भूखंड मोकळा दाखवून रहिवाशांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आपण 2 वर्षे पाठपुरावा करीत असूनही न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहन करु, असा इशारा दिला. त्यावर बोलताना विक्रांत चव्हाण यांनी दिवा भागात वाढलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत आक्रमक भूमिका घेतली.

    दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आपण उपोषणाचा मार्ग अनुसरला होता. त्यावेळी थातूरमातूर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर पुन्हा बेकायदा बांधकामे वाढीस लागली आहेत. या बांधकामांना संबधित अधिकारीच जबाबदार आहेत. या अनधिकृत बांधकामांबाबत भाष्य केले तर लागलीच बांधकाम करणारे लोक येऊन नगरसेवकांना भेटतात. ही ’टीप’ त्यांना कोण देतो? ठामपाच्या प्रशासनामध्ये ‘टीपर’ बसले आहेत का? असे सवाल त्यांनी उपस्थित करुन एकीकडे गोरगरीबांच्या हातगाड्यांवर कारवाई करणारे प्रशासन बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. त्यामुळे तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.