गिटार वाजवण्याच्या नादात तरुण पडला नाल्यात, अग्निशमन दलाने काढले सुखरूप बाहेर

कल्याण : कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथील नाल्याशेजारी ३२ वर्षीय तरुण गिटार वाजवत असताना नाल्यात पडला. मिळालेल्या माहितीनुसार गिटार वाजवण्याच्या नादात आपला तोल गमावून तरुण नाल्यात पडला आणि बराच

 कल्याण : कल्याण पूर्वेतील लोकग्राम येथील नाल्याशेजारी ३२ वर्षीय तरुण गिटार वाजवत असताना नाल्यात पडला. मिळालेल्या माहितीनुसार गिटार वाजवण्याच्या नादात आपला तोल गमावून तरुण नाल्यात पडला आणि बराच वेळ तो त्या नाल्यात अडकून पडला होता. ही बातमी कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला समजताच अग्निशामक दलाचे संजय सरोदे, विजय पाटील आणि सुरेश गायकर आदी कर्मचार्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणाला शिडीच्या सहाय्याने नाल्यातून सुखरूप बाहेर काढले. बाहेर काढल्यावर या तरुणाला अग्निशमनच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारत स्वच्छ केले.