covid hospital

कल्याण : कल्याणमध्ये मनपाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेत असलेल्या महिलेचे दागिने, व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांने घेऊन पोबारा केल्याने कोव्हिड सेंटरमधील रूग्ण सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण : कल्याणमध्ये मनपाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना उपचार घेत असलेल्या महिलेचे दागिने, व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांने घेऊन पोबारा केल्याने कोव्हिड सेंटरमधील रूग्ण सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(theft in kovid centre of kalyan)

कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरात केडीएमसीच्या माध्यमातून आसरा फाऊंडेशन कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना रूग्णावर उपचार केले जातात. बापगाव ए बी अपार्टमेंट मध्ये राहणारे श्रवण शर्मा यांच्या आई कोरोनाबाधित असल्याने आसरा फाऊंडेशन कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असताना त्यांच्याकडील ९७,००० रुपये किमतीचे दागिने, रोख ऐवज अज्ञात चोरट्यांने ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान चोरून पोबारा केला.

याबाबत फिर्यादी श्रवण शर्मा यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. बाजारपेठ पोलिसांनी भा.दं.वि. ३७९प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. बी मस्के या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत. कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना रूग्णांचे दागिने व रोख चोरीस जाण्याच्या घटनेने कोव्हिड सेंटरमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान याबाबत केडीएमसी आतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या कोव्हिड सेंटरमध्ये गार्ड नेमले आहेत.