smashanbhumi

भंगार चोरट्यांनी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले तीन लोखंडी बर्निंग स्टॅंड(burning tand theft at mohane graveyard) गायब केल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिकेच्या मोहने येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असतानाच आता भंगार चोरट्यांनी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले तीन लोखंडी बर्निंग स्टॅंड गायब केल्याने अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे.

    कोरोना उद्रेकात अंतिम संस्कार करण्यासाठी प्रशासनाने स्माशनभुमीकडे लक्ष देत लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करीत असताना चक्क स्माशनभूमीतील बर्निंग स्टँड चोरीला जातात याला कोण आवर घालणार असे चित्र यानिमित्ताने उभे ठाकले आहे.

    गेल्या काही वर्षांपासून या स्मशानभूमीला डागडुगी करून पालिका प्रशासन काम करीत असुन भंगार अवस्थेतील या स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहे. दोन दिवसापूर्वी उल्हास नदी किनारी असणाऱ्या स्मशानभूमीत चोरट्यांनी शिरकाव करून तीन बर्निंग स्टँड उखडून चोरले आहेत. यामुळे परिसरातील मृतदेहावर अंतिम अग्नीसंस्कार कसा द्यायचा हा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी या चोरी संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

    मोहने येथील स्मशानभूमीला अदानी उद्योग समूहाने २२ गुंठे जागा देण्याचे मान्य केल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी दिली आहे. चार महिन्यापूर्वी शिवसेनेचे कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्मशानभूमीचे भूमिपूजन केले होते. मात्र , अदानी समूहाने जागा देण्यास नकार दिला होता .

    या स्मशानभूमीकरिता पालिका प्रशासनाने ५० लाख रुपयांची तरतूद केली होती. पालिका प्रशासनाच्या वतीने अदानी समुहाबरोबर बैठक झाल्यावर स्मशानभूमीसाठी जागा देण्याचे त्यांनी कबूल केल्याची माहिती कोळी यांनी दिली. लवकरच या प्रस्तावित स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगून अमृत योजने अंतर्गत अदानी समूहाच्या जागेतून पाईप लाईन टाकण्याच्या कामाला देखील परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.