उल्हासनगरात चोरट्यानी फोडले कपड्याचे दुकान; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

बी के कलेक्शन या कपड्याच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. यामध्ये सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला

    ठाणे: उल्हासनगर शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच सुभाष टेकडी परिसरातील बी के कलेक्शन हे कपड्याचे दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी आता प्रवेश करून कपड्यासह गौतमबुद्धाची पितळेची मूर्ती चोरून पसार झाले. शेजारीच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली आहे.

    सुभाष टेकडी परिसरात असलेले बी के कलेक्शन या कपड्याच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाली ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. यामध्ये सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला असल्याचे दुकान मालक सुरज खरे यांच्याकडून सांगण्यात आले यासंदर्भात विठ्ठलवाडी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे खरे यांच्याकडून सांगण्यात आले.