पालघर जिल्ह्यामध्ये आज दुपारपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद ,जिल्ह्यात १३०१ कोरोनाबाधित

पालघर: : पालघर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्रीपासून आज सकाळी १० वाजेपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पालघर तालुक्यातल्या दातिवरे इथल्या एकाच घरातल्या ८ जणांचा

पालघर: : पालघर जिल्ह्यात आज दुपारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्रीपासून आज सकाळी १० वाजेपर्यंत १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पालघर तालुक्यातल्या दातिवरे इथल्या एकाच घरातल्या ८ जणांचा समावेश आहे. हे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.यात पालघर तालुक्यातल्या १२ तर डहाणु तालुक्यातल्या एकाचा समावेश आहे. या १३ नव्या रुग्णांपैैकी पालघरमधल्या गोकुळ रेसीडेन्सीमध्ये राहणाऱ्या ४१ वर्षीय १ डॉक्टरला कोरोनाची बाधा झाली आहे. या डॉक्टरचा दातिवरे इथे द्वाखाना आहे. २ कोरोना विषाणूबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना विषाणु ची बाधा झाली. तर डहाणू तालुक्यातल्या सरावली इथे राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. ती वसई-विरार महानगरपालिकेत आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे.

जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या आता १३०१ इतकी झाली आहे. त्यापैकी ४४ जणांचाा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या ६९६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५६१ इतक्या अॅक्टीव केसेस आहेत. जिल्ह्यातल्या ८ तालुक्यांपैकी पालघर, डहाणु, विक्रमगड, जव्हार, वसई आणि वाडा हे ६ तालुके वगळता तलासरी आणि मोखाडा हे २ तालुके असे आहेत जिथे अजून एकदेखील कोरोना  रुग्ण आढळून आलेला नाही. तर पालघर जिल्ह्यातल्या एकट्या वसई – विरार महानगरपालिका क्षेत्रात सर्वात जास्त ११०८ इतके रुग्ण सापडले. ११०८ पैकी आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यातली तालुकानिहाय आकडेवारी : पालघर तालुका – ८२(३ मृत्यू), डहाणु तालुका – ४०, जव्हार तालुका – ३, विक्रमगड तालुका – ६, वाडा तालुका – ७, वसई ग्रामीण – ५५ (३ मृत्यू), वसई विरार महानगरपालिका क्षेत्र – ११०८ (३८ मृत्य६ )