पेट्रोल पंपावर लूट करून पळणारे त्रिकुट अटकेत, ३२ हजारांची रोकड हस्तगत

पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दहशत माजवून पैशाची लूट (Loot) करीत ३२ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा करू पाहणाऱ्या त्रिकुटाला गस्तीवरील चितळसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत.

ठाणे : ठाणे शहराच्या (Thane City) चितळसर पोलीस ठाण्याच्या (Police)  हद्दीतील पेट्रोल पंपावर (Petrol Pump) दहशत माजवून पैशाची लूट (Loot) करीत ३२ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा करू पाहणाऱ्या त्रिकुटाला गस्तीवरील चितळसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. त्यांच्याकडून ३२ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे.

गुरूवारी रात्री चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तत्वज्ञान विद्यापीठ जवळील पेट्रोल पंपावर त्रिकुटाने पेट्रोल पंपाची ३२ हजाराची रोकड घेऊन पलायन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याच विभागात गस्त घालणारे चितळसर पोलीस ठाण्याच्या टीमने पळणाऱ्या त्रिकुटाला ३२ हजाराच्या रोकडीसह जेरबंद केले.

अटक आरोपींमध्ये प्रकाश अंगारी (२०), सुनील पाटीदार (२५) और मोहन डिडोर (३०) यांचा समावेश असून त्यांच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात भादंवि ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे करीत आहेत.