प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, पेपर्स रिम,शाई, कतार,स्केल, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयात नेल्यानंतर त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

ठाणे : लॉकडाऊनमध्ये (Lock Down) सोनाराची दुकान बंद झाले, विदेशात निघालेल्या संगणक मास्टरला एजंटने (Agent) ठेंगा दाखविला अशा त्रासलेल्या त्रिकुटाने चक्क भारतीय चलनातील हुबेहूब दिसणाऱ्या २ हजाराच्या बनावट नोटासह तिघांना वागळे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक (Arrest)  केली. त्यांच्याकडे तब्बल ८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा, संगणक, प्रिंटर, पेपर्स रिम,शाई, कतार,स्केल, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयात नेल्यानंतर त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

वागळे युनिटने अटक केलेल्या आरोपींमध्ये सचिन गंगाराम आगरे (२९) रा. मु.पो. कळंबट ता-चिपळूण, जि -रत्नागिरी, आरोपी मन्सूर हुसेन खान(४५) रा. बानमोहल्ला. शिराळ ता-चिपळूण जि रत्नागिरी आणि आरोपी चंद्रकांत महादेव माने(४५) रा. रूम नं १७ हकीमजी रुकमानजी चाळ , कुर्ला अंधेरी रॉड, साकीनाका यांचा समावेश आहे. यातील आरोपी सचिन याला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. तो दुबईला नौकरीसाठी जाणार होता. मात्र त्याला एजंटने दगा दिला. त्यामुळे तो मन्सूर खान याच्या झेरॉक्सच्या दुकानात काम करीत होता. तर आरोपी मन्सूर खान हा झेरॉक्सचे दुकान चालवीत होता. तर आरोपी चंद्रकांत महादेव माने याचे कोल्हापूरला सोन्या-चांदीचे दुकान होते. ते लॉकडाऊन मध्ये बंद झाले.

४० लाखाचे कर्ज झाले. म्हणून या तिघांनी लॉकडाऊनमध्ये झालेल्या कर्जाची परत फेड करण्यासाठी तिघांच्या युक्त्या वापरून २ हजाराच्या बनावट नोटा छपाई प्रिंटर, स्कॅनर, सॉफ्टवेअरचा वापर करून छापल्या आणि त्या बाजारात वटविण्याचा प्रयत्न कापूरबावडी परिसरात करताना वागळे युनिटच्या जाळ्यात अडकले. भारतीय चलनातील बनावट नोटा चालविण्यासाठी कापूरबावडी सर्कल येथील बसस्टॉपच्या समोर २ हजाराच्या बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासवून वटविण्याचा प्रयत्न करीत असल्याची खबऱ्याने खबर दिली. पोलीस पथकाने तिघांना ताब्यात घेतले. बनावट नोटा छपाईसाठी लागणाऱ्या साहित्यासह ८५ लाख ४५ हजाराच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या.

पोलिसांना सापडलेल्या बनावट नोटांमध्ये सॉफ्टवेअर आणि प्रिंटर सोबतच आरोपीनी स्क्रीन प्रिंटींगची मदत घेतली होती. विशेषतः या बनावट नोटांचे सिरीयल नंबर मात्र वेगवेगळे होते याची दक्षता आरोपींची घेतलेली होती. त्यामुळे संशय येत नव्हता. दरम्यान यानोटा दैनंदिन व्यवहारात वापरण्याचा मनोदय आरोपींचा होता अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४८९(अ), ४८९(ब ), ४८९(क ) आणि ३४ प्रमाणे गुहा दाखल केला. त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना १४ डिसेंबर, पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.