एलएसडी पेपर, एमडी, चरस, गांजा आदीसह सहा प्रकारच्या ड्रग्ससह तिघांना अटक

ठाण्यात काही इसम ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच (वागळे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून आयुब अन्सारी यास अटक केली. तर त्याच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना देखील बेड्या ठोकल्या.

ठाणे : ठाण्यात तिघांकडून एलएसडी पेपर, एमडी, चरस, गांजा (cannabis ) आदीसह सहा प्रकारचे ड्रग्स (drugs ) पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अयुब अन्सारी (रा. भिवंडी), हुसेन रजानी (अंधेरी, मुंबई) आणि नॅश उर्फ नबी शेख (चेंबूर) या तिघांना अटक केली आहे.

ठाण्यात काही इसम ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच (वागळे) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून आयुब अन्सारी यास अटक केली. तर त्याच्या चौकशीतून आणखी दोघांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना देखील बेड्या ठोकल्या. अटकेतल्या तिघांकडून पोलिसांनी एमडी, एलएसडी, चरस, गांजा आदी सहा प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ७ लाख ७८ हजार ८१० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटकेतल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.