आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या मुरबाडमध्ये सापडले तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

मुरबाड: आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या मुरबाड तालुक्यात बुधवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.काही दिवसांपूर्वी तालुक्यातील उमरोली (ब) येथे ठाणे येथून एक

 मुरबाड: आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या मुरबाड तालुक्यात बुधवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.काही दिवसांपूर्वी तालुक्यातील उमरोली (ब) येथे ठाणे येथून एक कोरोनाबाधित व्यक्ती राहून गेली होती.या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यातील दोघांचे तसेच मुरबाड शहरातील एका युवकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या रुग्णांना ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मुरबाड तालुका हा कोरोनाबाबतीत आतापर्यंत पूर्णपणे सुरक्षित असतांना बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांमुळे तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. तालुक्यात रुग्ण नसल्याने मुरबाडकर बेजबाबदारपणे वागत असून बाहेरून आलेल्या पाहुण्यांचे योग्य विलगीकरण करत नसल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.