मोबाईलचे दुकान लुटणारे तीन चोर पकडले – ११ लाख ६६,५९० रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत

वाडा :पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडुस पोलीस ठाणे अंतर्गत लॉकडाऊन काळात दुकान फोडण्यात आले होते. यातील तीन आरोपी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ११ लाख ६६ हजार ५९० रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत

वाडा :पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडुस पोलीस ठाणे अंतर्गत लॉकडाऊन काळात दुकान फोडण्यात आले होते. यातील तीन आरोपी पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ११ लाख ६६ हजार ५९० रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस बाजारपठेतील मँगो शॉपी हे दुकान १९ मे २०२० रोजी सायंकाळी फोडण्यात आले होते. 

या गुन्ह्यात ११ लाख ६६ ,५९०रुपये किमतीचे मोबाईल फोन,१० हजाराचं डीवीडीआर मशीन आणि २ लाख हून अधिक रक्कम ही अज्ञात व्यक्तीने चोरून ते पसार झाले होते. या गुन्ह्यातील तीन आरोपींना वाडा पोलिसांनी अटक केली असून यातील चोरण्यात आलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. 
या गुन्ह्याचा तपास करीत असता या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी ही भिवंडी येथे एका ठिकाणी आढळून आली होती. या गाडी मालकाचा शोध घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.यातील तीन आरोपी हे ७ जून रोजी पकडण्यात आले. या आरोपींकडून ११ लाख ६६ लाख ५९० या किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. प्रकरणाचा तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखा व वाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त मोहिमेत करण्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.