mephedrone

गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाला खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ठाण्यातील पोलीस पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ९० ग्रॅम एम. डी. पावडर(mephedrone powder) या अंमली पदार्थासह अटक(arrest) केली.

ठाणे : ठाणे(thane) अंमली पदार्थ तस्करांचा अड्डा(drugs) झाला आहे. अनेक तस्करांना ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने जाळ्यात अडकवून जेरबंद केलेले आहे. १८ जानेवारी रोजी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाला खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ९० ग्रॅम एम. डी. पावडर(mephedrone powder) या अंमली पदार्थासह अटक(arrest) केली. त्यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीमध्ये एका महिलेलाही समावेश आहे. या तिघा आरोपींना ठाणे न्यायालयात नेले. न्यायालयाने तिघांना २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.

गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हनीकोम्ब बारच्या समोर सर्व्हिस रोडवर ब्रिजच्या खाली दोन पुरुष आणि एक महिला अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची  माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा  रचला आणि आरोपी बनोबर शफिक खोटाळ (३१) रा. मस्जिद बंदर, मुंबई, आरोपी आदिल नाजीरभाई शेख(२४) रा. जुनागड, गुजरात आणि आरोपी असामा मोहम्मद हुसेन भाभा(१९) या महिलेचा समावेश आहे.

त्यांच्या अंगझडतीत विक्रीसाठी आणलेला तब्बल ४ लाख ५० हजार किमतीचा एमडी हा अंमली पदार्थ ९० ग्रॅम आढळला. त्यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात एमडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २२(क), २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयाने २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.