‘त्या’ मारहाण प्रकरणात तीन पोलिसांना अटक ; आव्हाडांच्या अडचणींत भर

सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे (Civil Engineer Anant Karamuse ) यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावरआक्षेपार्ह फेसबुक पोस्ट (FaceBook Post) केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सहा महिन्यांनी वर्तकनगर पोलिसांनी तीन पोलिसांना अटक (Three policemen arrested ) केली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याची समोर आली आहे.

ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांच्यावर सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे (Civil Engineer Anant Karamuse ) यांनी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट (FaceBook Post)   केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सहा महिन्यांनी वर्तकनगर पोलिसांनी तीन पोलिसांना अटक (Three policemen arrested ) केली आहे. तसेच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याची समोर आली आहे.

सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहतात. करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर ५ एप्रिल रोजी करमुसे यांना येथील पोलीस रात्रीच्या दरम्यान बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे.

या मारहाणीनंतर ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असताना एप्रिल महिन्यात करमुसे यांना मुंबईवरून भेटण्यासाठी निघालेल्या भाजपच्या काही नेत्यांना ठाण्याच्या सीमेवर रोखले होते. या सर्व घडामोडीनंतर वर्तकनगर पोलिसांनी एप्रिलमध्येच पाच आरोपींना अटक केली होती. आता या प्रकरणात तीन पोलिसांना अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. हे सर्व कर्मचारी पोलिस मुख्यालयातील असून ते बॉडीगार्ड आहेत. यातील दोन पोलीस मुंबईचे तर एक ठाण्यातील आहे. त्यांना जामीन मिळाला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

निरंजन डावखरे यांनी ठाणे पोलिसांचे केले अभिनंदन

आता तीन पोलिसांवर कारवाई झाली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. या प्रकरणात सहा महिन्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल डावखरे यांनी ठाणे पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांची अटक कधी होणार? किरिट सोमय्या यांचा सवाल

ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या पंधरा पोलीस बॉडीगार्डद्वारा सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांचं अपहरण केलं. त्यानंतर स्वत:च्या घरी आणून त्यांची मारहाण केली. त्या प्रकरणात ठाकरे सरकारने सहा महिन्यानंतर तीन पोलिसांची अटक केली. आतापर्यंत ९ लोकांची अटक झाली. परंतु जितेंद्र आव्हाड यांची अटक कधी होणार असा सवाल भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.