tansa river

तानसा नदी(Tansa River) येथे पूजा करण्यासाठी गेलेल्या तीन तृतीयपंथीयांचा(Three Transgenders Drowned In Tansa River) बुडून मृत्यू झाला आहे.

    नालासोपारा : खानिवडे(Khaniwade) हद्दीतील तानसा नदी(Tansa River) येथे पूजा करण्यासाठी गेलेल्या तीन तृतीयपंथीयांचा(Three Transgenders Drowned In Tansa River) बुडून मृत्यू झाला आहे. सध्या कोणाचाही मृतदेह सापडला नसून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

    खानिवडे खराटतारा येथे तानसा नदीत आंघोळीसाठी नदीत गेलेले तीन तृतीपंथीय पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. वसई-विरार शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीत शोध मोहीम हाती घेतली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

    गुरुवारी घटस्थापना असल्याने नदीत आंघोळ करून दुर्गापूजा करण्याचे ६ तृतीयपंथीय गेले होते. तानसा नदीत अंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले.  तीन बाजूला राहिले तर तीन तृथियपंथीयांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांचे तीन साथीदार नदीबाहेर येत ते बुडाले असल्याची माहिती त्यांनी विरार पोलिसांना दिली.

    अरिका ( ४०) प्राची (२३) व सुनीता (२७) अशी बुडालेल्या तृतीयपंथींची नावे असून वसई-विरार शहर महापालिका अग्निशमन दल, मुंबई सायन येथून आलेले दल यांनी बोटीतून तानसा नदीत शोध मोहीम हाती घेतली आहे.