कल्याण येथील  तीन अनोखे कोविड योद्धे

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरपोच देत आहेत औषध

कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांत कोरोना  रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे याचं परिस्थितीत महानगरपालिकेने ज्या रुग्णांना आपल्या घरीच विलगीकरणात राहणे शक्य आहे त्यांना घरातच विलगीकृत केले. संबंधित रुग्णांना घरपोच औषधे देण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा यांसाठी पालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत अविनाश पाटील या युवकांने आपले इतर दोन मित्र चेतन म्हामुणकर आणि स्वप्नील शिरसाठ यांच्या मदतीने हे अवघड काम करण्यास होकार दिला.

७ जुलै पासुन रोज संबंधित रुग्णांच्या घरी जावुन त्यांना हे युवक औषधी देत आहेत यांसाठी लागणारे औषधे संबंधित हेल्थ पोस्ट कडुन या युवकांना दिले जाते. त्याचबरोबर पेशंटच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वरीष्ठ नागरिकांचा एक गट देखील कार्यरत आहे. पेशंटला गोळ्या संदर्भात मार्गदर्शन करणे त्यांची वेळोवेळी विचारपूस करणे हे काम ते करत आहेत. स्वयंसेवकांच्या नियोजनपूर्वक कामामुळे हेल्थपोस्टला देखील मदत मिळाली आहे. अविनाश पाटील आणि स्वप्नील शिरसाठ यांनी समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण घेतले आहे तर चेतन म्हामुणकर गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहे.

कल्याण शहरांतील या तीन कोविड योध्दामुळे अनेकांना तातडीने मदत मिळत आहे. त्यामुळे या तरुणांच्या कामांचे कौतुक सर्वच स्तरांतुन होत आहे. महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी त्याचबरोबर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील आणि आरोग्य केंद्राचे डॉ. सतेज शर्मा, डॉ. सीमा जाधव, डॉ. शोभा साबळे, डॉ. रश्मी ठाकुर, डॉ. वैशाली काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. या संपुर्ण कामांचे नियोजन डॉ. स्नेहलता कुरीस करत आहेत.