kolsewadi killing

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील रस्त्यावर रिक्षाचालकाने एका मुलीची छेड काढली. यामुळे घाबरून या तरुणीने तिचे मित्र राहुल गडेकर, बंटी प्रधान या दोघांना फोन डोंबिवलीवरून बोलावले. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले असता, छेड काढणारा रिक्षाचालक आणि जमावाने या दोन्ही तरुणांना पट्ट्याने व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण(Beating In Kolsewadi) केली.

  कल्याण : एका तरुणीसह २ तरुणांना मध्यरात्री जमावाने बेदम मारहाण(Beating to one girl and two boys by mob) केल्याची कल्याण पूर्वेतील कोसळसेवाडी भागात घडली आहे. याप्रकरणी आता ९ तासानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रिक्षावाल्यासह बेदम मारहाण करणाऱ्या अज्ञात जमावाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास सुरू केला.

  याप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर राहुल गडेकर, बंटी प्रधान असे बेदम मारहाण झालेल्या तरुणाची नावे आहेत.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेली तरुणी डोंबिवलीत राहत असून शुक्रवारी रात्री उल्हासनगर परिसरात मैत्रिणीच्या घरी तिच्या वाढदिवसाला गेली होती. वाढदिवस संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीने रिक्षा घेतली आणि ती घरी परतत होती. यावेळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील रस्त्यावर रिक्षाचालकाने तिची छेड काढली. यामुळे घाबरून या तरुणीने तिचे मित्र राहुल गडेकर, बंटी प्रधान या दोघांना फोन डोंबिवलीवरून बोलावले. यानंतर हे दोघे मित्र त्या ठिकाणी पोहोचले असता, छेड काढणारा रिक्षाचालक आणि जमावाने या दोन्ही तरुणांना पट्ट्याने व लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली. एवढेच काय तर या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली.

  या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी घटना घडून तब्बल ९ तासाने गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या जमावाचा शोध घेत ८ हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र रिक्षाचालक असलेला मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.

  किरीट सोमय्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. कल्याण कोळसे वाडी परिसरात, तरुण मुलीची छेडछाड व तिचा मदतीला आलेले दोन तरुणांची मारहाण करणाऱ्या गुंडाची अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, त्या गुंडाची अटक करण्याची मागणी केली आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

  या विषयावर आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिसांवर टीका करत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जो गुन्हा दाखल करण्यासाठी जातो त्यालाच गुन्हेगार बनवलं जात त्याचबरोबर तक्रारदार व आरोपीमध्ये सेटिंग करतात चांगली सेटिंग झाली तर दोघांना सोडून दिले जाते अन्यथा दोघांवरही कारवाई केली जाते अशाप्रकारे पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला यामुळेच कल्याण गुन्हेगारी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.