शिवसेनेच्या माध्यमातून गणेश कॉलनी आणि रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील दहा वर्षांपासून प्रलंबित गटाराचा प्रश्न मार्गी

याबाबत सभापती दया शेट्टी यांना विचारले असता जेतवन नगर परिसरातून येणारे सांडपाणी आता गणेश कॉलनी आणि आर एस बिल्डिंग येथे रस्त्यावर साठणार नाही येथे मोठा पाईप टाकून हे पाणी एन आर सी कंपनी च्या भूमिगत गटाराला जोडले आहे आता या जागेवर लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान बनविणार असल्याचे दया शेट्टी यांनी सांगितले

कल्याण: प्र.क्रं १३ मोहने गावठाण प्रभागातील गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून रखडलेल्या गणेश कॉलनी, रमाबाई आंबेडकर नगर आर एस बिल्डिंग येथील नागरिकांची समस्या बनलेल्या गटाराचा दहा वर्षापासून रखडलेला प्रश्न अखेर सुटला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्र. क्र. १३ मोहने गावठाण मधील रमाबाई आंबेडकर नगर, गणेश कॉलनी आणि आर. एस. बिल्डिंग येथील नागरिकांना सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटाराची सुविधा नसल्याने येण्या-जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. गटाराचे पाणी रस्त्यावर इतस्त: पसरत असल्याने लहान मुले वयोवृद्ध व गरोदर मातांना या गटाराच्या पाण्यातून चालावे लागत असे. जेतवननगर परिसरातील गटाराचे सांडपाणी आर एस बिल्डिंगच्या पाठीमागे व गणेश कॉलनी परिसरात साठून राहत असल्यामुळे डेंगू मलेरिया मच्छरांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरण्याचा धोका होता. गटाराचे पाणी रस्त्यांवर साठून राहत होते. रस्त्याने चालणे कठीण झाले होते. नागरिकांची समस्या जाणून घेत प्रशासनाकडे पाठपुराव्याने शिवसेनेच्या माध्यमातून ” अ” प्रभाग सभापती दया शेट्टी यांनी या कामासाठी आपल्या नगरसेवक निधी मधून तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. सध्या गटाराचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून केवळ दहा टक्के काम उरले आहे.पूर्वीप्रमाणे गटाराचे पाणी रस्त्यावर साठणार नसून आर एस बिल्डिंग येथे मोठा पाईप टाकून ते पाणी कंपनीच्या भूमिगत गटारांमध्ये सोडण्यात आले आहे. बिल्डिंग परिसरात पाणी साठणार नसल्याने येथे लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान बनविण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षापासून चा प्रलंबित असलेला प्रश्न सुटल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला तसेच सभापती दया शेट्टी यांचे आभार व्यक्त केले.


” याबाबत सभापती दया शेट्टी यांना विचारले असता जेतवन नगर परिसरातून येणारे सांडपाणी आता गणेश कॉलनी आणि आर एस बिल्डिंग येथे रस्त्यावर साठणार नाही येथे मोठा पाईप टाकून हे पाणी एन आर सी कंपनी च्या भूमिगत गटाराला जोडले आहे आता या जागेवर लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान बनविणार असल्याचे दया शेट्टी यांनी सांगितले.”

‘अ’ प्रभाग सभापती दया शेट्टी यांनी प्रभागांमध्ये गटारे नाले रस्ते विविध प्रकारचे कामे केली असून लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. शेट्टी यांनी दहा वर्षांपासून रखडलेल्या गटारांचा प्रश्न सोडविल्याने आम्ही त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो असे आर.एस. बिल्डिंग येथील रहिवाशी सुरेन्द्र यादव यांनी यानिमित्ताने सांगितले.”