कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी औषध दुकानांची वेळ मर्यादित, डोंबिवली केमिस्ट असोसिएशनचा निर्णय

डोंबिवली : शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औषधांच्या निमित्ताने नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहे. यावर नियंत्रण यावे तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे या करता औषध दुकानांची वेळ

 डोंबिवली : शहरात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. औषधांच्या निमित्ताने नागरिक दिवसभर घराबाहेर पडत आहे. यावर नियंत्रण यावे तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे या करता औषध दुकानांची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत औषधी दुकान सुरू राहतील.

अत्यावश्यक प्रसंगी रुग्णांनी दुकानाबाहेरील क्रमांकावर संपर्क केल्यास औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. एकही रुग्णांला औषधांची कमतरता भासणार नाही असे अध्यक्ष दिलीप देशमुख, सचिव विलास शिरुडे यांनी सांगितले आहे. इमर्जन्सी मध्ये ०९७०२४००१११, ०९७०२६६५१११, ०८६९१०९१०५५ या क्रमांक वर संपर्क करावा असे आवाहन डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.