टिटवाळ्यात काल पुन्हा बत्ती गुल

कल्याण : टिटवाळ्यात बुधवारी रात्री बत्ती गुल झाल्याने टिटवाळाकर वीज ग्राहकांना सुमारे दोन तास ब्लॅक आऊटला समारे जावे लागले. टिटवाळाकर ग्राहक वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नाबाबत पुरते

कल्याण : टिटवाळ्यात बुधवारी रात्री बत्ती गुल झाल्याने टिटवाळाकर वीज ग्राहकांना सुमारे दोन तास ब्लॅक आऊटला समारे जावे लागले. टिटवाळाकर ग्राहक वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नाबाबत पुरते हैराण झाले आहे. आंदोलनापासून ते कालपरवा सोशल मीडियामार्फत वीज बील जाळीत टविट् करत वीज ग्राहकांनी निषेध व्यक्त करीत वीज पुरवठा ग्रहण कधी सुटणार असा सवाल महावितरणला केला जात आहे.                   

बुधवारी रात्री ११.३०च्या सुमारास टिटवाळ्यातील बत्ती गुल झाली. तब्बल दोन तासानंतर वीज पुरवठा सुरु झाला.महावितरणाच्या वारंवार खंडित वीजपुरवठा प्रश्न कधी सुटणार असा सवाल यानिमित्ताने पुन्हा उभा रहिला आहे.टिटवाळा  महावितरणचे अभियंता महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,  बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास महापोरषणच्या पडघा अंबरनाथ लाईनला बिघाड झाला असल्यामुळे मोहने सबस्टेशन येथून संपूर्ण विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. टिटवाळ्यात काही भागात वीज पुरवठा सुरू होता. खंडित वीज पुरवठा सुमारे २ तासांंनी  सुरळीत झाला.