टिटवाळ्यासह ग्रामीण भागातील बत्ती गुल

कल्याण : निसर्ग वादळामुळे आलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे गोवेली येथे महावितरण इनकमर लाईनवर फांदी पडल्याने तसेच रायता येथे कंडक्टर तुटल्याने टिटवाळ्यासह कल्याण ग्रामीणचा वीज पुवरठा खंडित

कल्याण : निसर्ग वादळामुळे आलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे  गोवेली येथे महावितरण इनकमर लाईनवर फांदी पडल्याने तसेच रायता येथे कंडक्टर तुटल्याने  टिटवाळ्यासह कल्याण ग्रामीणचा वीज पुवरठा खंडित झाला. महावितरणाने तातडीने धाव घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच टिटवाळ्यात पाच ठिकाणी विद्युत पोल पडल्याच्या घटना घडल्या  तसेच, मोहने, रायता गोवेली ठिकाणी बाधित लाईनचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु असुन रात्री उशीरा दुरूस्ती पुर्ण झाल्यावर विद्युत पुरवठा सुरु होणार असल्याचे महावितरणाचे अभियंता महाजन यांनी सांगितले.