महापालिकेच्या आयुक्तांना कोरोना, खासगी रुग्णालयात उपचार सुरू, पहिला डोस घेतल्यानंतर झाली कोरोनाची लागण

डॉ. विपीन शर्मा यांची मागच्या वर्षी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात डॉ.विपीन शर्मा यांनी रस्त्यावर उतरून काम केले होते. अनेक महिन्यापासून डॉ. शर्मा यांनी पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत कोरोनाला आळा घालण्यासाठी काम करत होते. मात्र आता त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी टेस्ट केली असता, त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.

    ठाणे :  ठाण्यात कोरोना रुग्ण वाढत असताना पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना देखील कोरोनाची लागण झाली  आहे.  त्यांना  ठाण्यातीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची तब्बेत स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त शर्मा यांनी अनेक बैठकांना उपस्थित होते, तसेच मागील आठवड्यात मंत्रालयात देखील कोरोना संदर्भात बैठकीला शर्मा यांनी हजेरी लावली होती.

    डॉ. विपीन शर्मा यांची मागच्या वर्षी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात डॉ.विपीन शर्मा यांनी रस्त्यावर उतरून काम केले होते. अनेक महिन्यापासून डॉ. शर्मा यांनी पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत कोरोनाला आळा घालण्यासाठी काम करत होते. मात्र आता त्यांना थोडा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी टेस्ट केली असता, त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.

    काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांनी लसीकरण करून पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शासनाच्या आदेशाने काही दिवसांच्या फरकानंतर दुसरा डोस घेण्यात येणार होता, मात्र धावपळ आणि शासकीय कामांमुळे अनेकांच्या संपर्कात आल्याने त्यांची कोविड चाचणी पोसिटीव्ह आली आहे. संबंधित डॉक्टरांनी आयुक्त शर्मा यांना आराम करण्याचा सल्ला दिला असून लवकरच शर्मा बरे होऊन पुन्हा आपल्या कामाला लागतील असे वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना सांगितले.