भिवंडीत ३८ लाखांचा गुटखा, तंबाखूजन्य साठा जप्त

भिवंडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्याआधीपासूनच कोरोनाचा प्रसार ज्या गोष्टींमधून होऊ शकतो अशा तंबाखू सिगरेट व अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी व्यावसायिकांवर

भिवंडी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्याआधीपासूनच कोरोनाचा प्रसार ज्या गोष्टींमधून होऊ शकतो अशा तंबाखू सिगरेट व अनधिकृतपणे गुटखा विक्री करणाऱ्या पानपट्टी व्यावसायिकांवर बंदी आणली. त्यानंतर ही बहुतांश ठिकाणी गुटखा सर्रास पणे चढ्या दराने विकला जात असल्याने अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्री हाणून पाडण्यासाठी कंबर कसली असून मागील आठवड्यात तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील गोदमावर कारवाई करीत ८४ लाखांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई ताजी असतानाच अन्न व औषध विभागाच्या दक्षता पथकाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांना राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील मुनीसुरत कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक कंटेनर मधून गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाल्या वरून त्यांच्या नेतृत्वा खालील सहाय्यक आयुक्त भूषण मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी अरुण खडके ,माणिक जाधव ,शंकर राठोड, अरविंद कांडेलकर, एम एम सानप, संतोष सुरसिया या पथकाने कारवाई करीत कंटेनर क्रमांक एच आर ५६ – ए एच ४७५६ तपासणी केली असता त्यामध्ये १०० गोणी मधून सुधा प्लस हा प्रतिबंधित गुटखा किंमत ३७ लाख ८० हजार आढळून आला आहे .या सह कंटेनर किंमत १५ लाख असा एकूण ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दक्षता विभागाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली आहे . विशेष म्हणजे ही गुटखा वाहतूक आयुर्वेदिक सॅनिटायझर ,श्वान शॅम्पू अशा वस्तू असलेल्या बॉक्स मागे गोणी ठेवून करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे .सदरचा माल साठवण करणाऱ्या विरोधात अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ भारतीय दंड संहिता कायद्या नुसार नारपोली पोलीस स्टेशन याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुर केली असून त्यानंतर या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येणार  असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिले आहे.