टोकावडे पोलीसांची धडक कारवाई – गावठी दारू हातभट्ट्या उद्ध्वस्त

मुरबाड :मुरबाडमध्ये सुरु असलेल्या गावठी दारू हातभट्टयांवर टोकावडे पोलीसांकडून कारवाईचे सत्र सुरूच असून वेळुक गावात पुन्हा पोलिसांनी गावठीच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत.लाॅकडाऊनमध्ये

मुरबाड :मुरबाडमध्ये सुरु असलेल्या गावठी दारू हातभट्टयांवर टोकावडे पोलीसांकडून कारवाईचे सत्र सुरूच असून वेळुक गावात पुन्हा पोलिसांनी गावठीच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. लाॅकडाऊनमध्ये तालुक्यातील एकमेव वाईन शाॅप बंद असल्याने गावोगावी गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. अनेक दिवसांपासून मुरबाड, टोकावडे पोलीसांकडून कारवाई सुरु असताना काल पुन्हा टोकावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भरत ननावरे, आदी पोलीस कर्मचारी यांनी वेळुक गावाच्या हद्दीत धाड टाकून चाळीस हजार रुपये कीमतीचे गावठी हातभट्टी दारूचे रसायन नष्ट केले.वेळुक गावात अनेकदा कारवाई होऊनसुद्धा येथे नदीपात्रात गावठी दारू हातभटट्या सुरूच आहेत.