
पार्किंग केलेल्या गाड्या उचलल्यानंतर वाहनाच्या ठिकाणीच लावण्यात येणाऱ्या स्टिकरमध्ये वाहतूक चौकी, चौकीचे नाव, दूरध्वनी क्रमांक याचा समावेश राहणार आहे. यामुळे वाहन कुठल्या चौकीत नेण्यात आले याची निश्चित माहिती वाहन मालकाला सहज उपलब्ध होणार आहे.
- गाड्या उचलण्यापूर्वी अनाऊन्स आणि जागेवर लागणार वाहतूक विभागाचे स्टिकर
ठाणे : ठाण्यात रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकी उचलून नेल्यानंतर दुचाकी शोधात फिरणाऱ्या ठाणेकरांच्या त्रास आता कमी होणार आहे. तर टोईंग व्हॅनचा बेशिस्त कारभाराला आता यापुढे आळा बसणार आहे. १ जानेवारी पासून गाड्या उचलण्यापूर्वी गाडी नंबरचे अनाऊन्स करून गाडी उचलल्यानंतर त्याठिकाणी वाहतूक विभागाचे स्टिकर ;लावण्याची अंमलबजावणी नव्या वर्षात करण्यात येणार असलायची माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
टोईंग व्हॅन कंत्राटदाराच्या करारामध्येच अति-शर्थीमध्ये नियम लागू करण्यात येणार आहे. पार्किंग केलेल्या गाड्या उचलल्यानंतर वाहनाच्या ठिकाणीच लावण्यात येणाऱ्या स्टिकरमध्ये वाहतूक चौकी, चौकीचे नाव, दूरध्वनी क्रमांक याचा समावेश राहणार आहे. यामुळे वाहन कुठल्या चौकीत नेण्यात आले याची निश्चित माहिती वाहन मालकाला सहज उपलब्ध होणार आहे.
तर गाड्या उचलताना होणाऱ्या आदळ आपटमुळे गाड्यांचे नुकसान होत असल्याची बोंब असते नव्या वर्षात मात्र ही बोंबही राहणार नाही. कारण गाड्या उचलताना त्याचे व्हिडिओ चित्रण करण्यात येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात वाहतूक विभागाच्या नव्या नियमावलीचा फायदा ठाणेकरांना होणार असल्याचे चित्र आहे.