कल्याण मुरबाड रस्त्यावरील वाहतूक ठप्प ; खाडी अन् नदीचे पाणी शिरले लोकवस्तीत

कल्याणमध्ये कोसळधार पाऊस झाल्यामुळे खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी आणि खाडीचे पाणी आसपासच्या घरांत आणि परिसरात शिरले आहे. 

    राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्यामुळे वालधूनी नदी दुथडीभरून वाहत आहे. कल्याणमध्ये कोसळधार पाऊस झाल्यामुळे खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदी आणि खाडीचे पाणी आसपासच्या घरांत आणि परिसरात शिरले आहे.

    योगीधाम, गौरीपाडा, अनुपनगर, अशोकनगर, शिवाजीनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासनगर, गोविंदवाडी परिसर हा जलमय झाला आहे. खाडीचे पाण्याची पातळी वाढत आहे.

    रस्त्यावर पाणी आल्याने कल्याण मुरबाड रस्ता, कल्याण पुणे लिंक रोड, कल्याण गांधारी रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर गुडघ्या इतके पाणी साचले आहे. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.