burning car saved by traffic police

पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या पोलो कारने कापुरबावडी नजीकच्या गोल्डन क्रॉस सर्कलजवळ अचानक पेट(burning car at golden cross circle) घेतला. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत एक रेडिमिक्स काँक्रिटची गाडी थांबवून त्यातल्या पाण्याने ही आग आटोक्यात आणली.

ठाणे : पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत असलेल्या पोलो कारने कापुरबावडी नजीकच्या गोल्डन क्रॉस सर्कलजवळ अचानक पेट(burning car at golden cross circle) घेतला. मात्र, बंदोबस्तावर तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत एक रेडिमिक्स काँक्रिटची गाडी थांबवून त्यातल्या पाण्याने ही आग आटोक्यात आणली. गाडीतील मौल्यवान सामानही त्यामुळे सुरक्षित राहिले. वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याची पाठ थोपटली आहे.

 

एमएच – १२ एफवाय ८८९७ या क्रमांकाची पोलो कार शुक्रवारी सकाळी पुण्याहून ठाण्याच्या दिशेने येत होती. गोल्डन क्रॉस परिसर ओलांडत असताना अचानाक या गाडीच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे भेदरलेल्या सौरभ सिंग यांनी गाडी थांबवली. त्यानंतर सिंग दांम्पत्य तातडीने गाडी बाहेर पडले. दुसऱ्या क्षणी या गाडीने अचानक पेट घेतला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस हवालदार श्रीकांत वानखेडे, भोये आणि राठोड यांनी पाणी टाकून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी समोरच्या रस्त्यावरून जाणारे बीटकाँन कंपनीचे रेडी मिक्स काँक्रिटचे वाहन थांबविले. काँक्रिट मिक्स करण्यासाठी वापरले जाणाऱ्या पाण्याच्या सहाय्याने त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

traffic police

या गाडीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेली एक बॅग होती. पूर्ण गाडीने पेट घेण्यापूर्वीच आग आटोक्यात आल्यामुळे मौल्यवान साहित्याची ती बॅगही सुरक्षित राहिली. त्यानंतर पोलिसांनीच क्रेनच्या सहाय्याने ही गाडी गॅरेजपर्यंत पोहोचवली. सिंग दाम्पत्याने मदतीस धावून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे आभार मानले. वाहतूक पोलिसांच्या कापूरबावडी उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. जी. लंभाते यांनीसुध्दा वानखेडे, भोये आणि राठोड या पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात या पोलीस कर्मचाऱ्याचा छोटेखानी सत्कारही करण्यात आला.