भिवंडीतून बाराशे परप्रांतीय कामगारांना घेऊन श्रमिक ट्रेन बिहारकडे रवाना

भिवंडी : भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत बिहार राज्यातील मजूर कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून कोरोना या विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे येथील यंत्रमाग उद्योग

भिवंडी : भिवंडी या यंत्रमाग उद्योग नगरीत बिहार राज्यातील मजूर कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून कोरोना या विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे येथील यंत्रमाग उद्योग ठप्प आहे. भिवंडी शहरात अडकून पडलेला बिहार राज्यातील स्थलांतरित मजूर कामगार हताश झाला होता . अशा बाराशे कामगारांना घेऊन आज एक विशेष ट्रेन पटना बिहारच्या दिशेने रवाना झाली आहे .

भिवंडी शहरात अडकून पडलेले बिहार राज्यातील स्थलांतरित मजूर कामगार ४० दिवसांपासून काम नसल्याने व हाती पैसा नसल्यामुळे हवालदिल झाले होते . त्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागली होती. मात्र  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता . तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मुंबई महानगर प्रादेशिक प्राधिकरण क्षेत्रांमधील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था राज्य शासनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने करून दिले आहे. भिवंडी येथून गोरखपूर उत्तर प्रदेश, जयपुर राजस्थान येथील दोन श्रमिक रेल्वे भिवंडी तून प्रवाशांना घेऊन रवाना झाल्यानंतर बुधवारी दुपारी ४ वाजता  बिहार पटना या ठिकाणी जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन १२०० प्रवाशांना घेऊन रवाना झाली . पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे , उपविभागीय अधिकारी डॉक्टर मोहन नळदकर, तहसिलदार शशिकांत गायकवाड यांसोबतच रेल्वे, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी यांनी या विशेष श्रमिक रेल्वेने प्रवास करणाऱ्या कामगारांना टाळ्या वाजून शुभेच्छा देत त्यांना निरोप दिला.

 या अडकून पडलेल्या कामगारांसाठी राज्य शासन, पोलीस, महसूल व रेल्वे यंत्रणा काटेकोर नियोजन करून या प्रवाशांना सुखद प्रवासाचा आनंद देत असून त्यासाठी सर्व प्रवाशांना प्रवास दरम्यान दोन पॅकेट पुलाव,३ पाण्याच्या बाटल्या ,बिस्कीट,साबण , मास्क या साहित्याचे किट्स प्रशासनाच्या वतीने देण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे. केंद्र शासन, रेल्वे मंत्रालय स्थलांतरीत मजूर कामगारांकडून प्रवासाचे भाडे घेणार नाही तर त्याचा भाग ८५% रेल्वे मंत्रालय व १५ टक्के संबंधित राज्य उचलेल असे सांगत असले तरीसुद्धा आज भिवंडी ते बिहार पटना या विशेष श्रमिक ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या कामगारांकडून प्रवास भाड्यापोटी ७२५ रुपये घेतल्याची माहिती प्रवासी कामगारांनी दिले आहे .