भिवंडीतून साडेसहा हजार कामगार विविध राज्यांमध्ये ट्रेनने रवाना

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे कामगार नगरी भिवंडीत अडकून पडलेले विविध राज्यातील सुमारे साडेसहा हजार कामगार गेल्या पाच दिवसांमध्ये अशा कामगारांना

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशातच कामगार नगरी भिवंडीत अडकून पडलेले विविध राज्यांमधील सुमारे साडेसहा हजार कामगार गेल्या पाच दिवसांमध्ये आपल्या गावी पोहोचले आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी पोचवण्यासाठी  मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मोफत प्रवास होण्यासाठी कामगारांच्या विशेष ट्रेनने त्यांच्या गावी पाठविण्यात आले.

राज्य शासनाच्या वतीने यंत्रमाग कामगार व गोदामामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष ट्रेनची योजना आखण्यात आली आहे.जे जे कामगार गोरखपूर,जयपूर ,पाटणा, बिहार, मधुबनी या ठिकाणी कामगारांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन भिवंडी रोड रेल्वे स्थानकातून रविवारपासून गुरुवारपर्यंत सुमारे ६ हजार ४१५  कामगारांना भिवंडीहून त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.  यावेळी भैरव सेवा समिती व अखिल भारत गुजराती समाज यांच्या वतीने कामगारांना भोजनाची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी तहसिदार कार्यालयामार्फत पाटीदार भवन हॉल येथून कामगारांसाठी भोजन वितरण व्यवस्था मंडलाधिकारी दत्तात्रय बांबळे, किरण केदार, भास्कर टाकवेकर यांनी उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिदारविठ्ठल गोसावी यांच्या पुढारकराने करण्यात आली. यावेळी पोलीस उपयुक्त राजकुमार शिंदे ,उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर, तहसिदार शशिकांत गायकवाड पालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर,नायब तहसिदार महेश चौधरी यांनी टाळ्या वाजवत यावेेेळी कामगारांना निरोप दिला.