पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेनिमित्त वडाचे वृक्षारोपण, जोपासनेचाही महिलांनी घेतला वसा

डोंबिवली : जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून डोंबिवली औद्योगिक विभाग मिलापनगर महिला मंडळातर्फे पाच वडांच्या झाडांचे प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांची

 डोंबिवली : जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून डोंबिवली औद्योगिक विभाग मिलापनगर महिला मंडळातर्फे पाच वडांच्या झाडांचे प्रथम वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्यांची रीतसर पूजा केली.  या महिलांनी खड्डे खणून त्यात वडाची रोपे लावली आहेत. या वृक्षांची निगा व जोपासना यापुढेही त्या करणार आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण, कोरोनाचे आलेले संकट यामुळे वडा सारखी भरपूर ऑक्सिजन देणारी देशी झाडे यापुढे या महिलांच्या माध्यमातून लावण्यात येणार आहेत. या वृक्षारोपण प्रसंगी मिलापनगर महिला मंडळाचा अध्यक्षा वर्षा महाडिक, उपाध्यक्षा संध्या चोळकर, सुहासिनी वाळके, शोभा कामथ, मीना कुलकर्णी, सीमा देशपांडे, संध्या सप्रे, उत्तरा गोगटे, भारती मराठे या महिला उपस्थित होत्या.