accident

भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर(bhivandi thane bypass road) लोढा धाम या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ०४ एचएस १२७३ वरील ट्रक चालक(truck driver death) बाबुराव खोत यास अचानक आकडी आल्याने त्याचा ट्रक वरील ताबा सुटला. ट्रक रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला येऊन धडकला त्या वेळेसही तो ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर तडफडत होता. त्यानंतर त्यास खाली उतरवले असता तो बेशुद्ध झाला. यावेळी विरुद्ध दिशेने येणारी एस टी बस व कार चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अपघात टळला.

भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर(bhivandi thane bypass road) लोढा धाम या ठिकाणी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ०४ एचएस १२७३ वरील ट्रक चालक(truck driver death) बाबुराव खोत यास अचानक आकडी आल्याने त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला येऊन धडकला त्या वेळेसही तो ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर तडफडत होता. त्यानंतर त्यास खाली उतरवले असता तो बेशुद्ध झाला. यावेळी विरुद्ध दिशेने येणारी एस टी बस व कार चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अपघात टळला.

नारपोली पोलिसांनी ट्रक चालकास आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले असता तो मृत असल्याचे घोषित केले . दरम्यान या ट्रक चालकास सकाळी ताप आलेला असतानाही तो कामावर येऊन ट्रक मध्ये माल भरून निघाला होता,अशी माहिती त्याच्या परिचितांनी पोलिसांना दिली आहे .