ट्रक-टेम्पोच्या अपघातात कामगाराचा मृत्यू

भिवंडी: भरधाव टेम्पो चालकाने अचानक ब्रेक लावल्याने टेम्पो समोरून आलेल्या ट्रकवर आदळून अपघात झाल्याने या अपघातात एका कामगाराचा मृत्यू तर टेम्पोचालकासह दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना वळपाडा

 भिवंडी: भरधाव टेम्पो चालकाने अचानक ब्रेक लावल्याने टेम्पो समोरून आलेल्या ट्रकवर आदळून अपघात झाल्याने या अपघातात एका कामगाराचा मृत्यू तर टेम्पोचालकासह दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना वळपाडा येथे घडली आहे. या अपघात प्रकरणी पिकअप टेम्पो चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहम्मद याकूब अन्सारी असे गुन्हा दाखल झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.टेम्पो चालक मोहम्मद हा अंजुरफाटामार्गे दापोडा रोडने माणकोली बाजूकडे जात असताना वळपाडा कमानीच्यासमोर त्याने त्याच्या ताब्यातील पिकअप टेम्पो भरधाव वेगाने चालवून अचानक ब्रेक दाबल्याने टेम्पोने टर्न घेऊन युसुफ अब्दुल करीम याच्या ट्रकला धडक दिली.त्यात पिकअप टेम्पोमध्ये बसलेले कामगार सैय्यद व मिराज हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत तर फिरोज सफिर अहमद काझी हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहेत.