तुंगारेश्वर येथील वार्षिक याग आणि भंडारा उत्सव रद्द

वाडा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचा विष्णु याग तसेच भंडारा २८ ते ३० एप्रिल असा तीन दिवसीय होणारा भंडारा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती

वाडा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील तुंगारेश्र्वर येथील बालयोगी सदानंद महाराज यांचा विष्णु याग तसेच भंडारा २८ ते ३० एप्रिल असा तीन दिवसीय होणारा भंडारा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्था यांच्याकडून देण्यात आली आहे. बालयोगी सदानंद महाराज आश्रम संस्था हे तुंगारेश्वर येथे आहे.या ठिकाणी २८ एप्रिल ते ३० एप्रिल २०२०पर्यंत विष्णु याग तथा भंडारा आयोजित करण्यात आला होता.मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.भाविकांनी येऊ नये, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.