पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरतोय – वाड्यात आज १२ नवे रूग्ण

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत त्यामुळे वाडा तालुक्यातील रूग्ण संख्या २० झाली आहे.यात ५ रूग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी

वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत त्यामुळे वाडा तालुक्यातील रूग्ण संख्या २० झाली आहे.यात ५ रूग्ण  बरे झाले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपूले यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील आज १२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.यात तालुक्यातील भावेघर गावात एक कैदी पुण्याहून आला होता.

किरवलीचे एकूण  ५, मोहटयाचा पाडा येथील ३,(हे ८ हायरिस्क मधले आहेत),चिंचघरपाडाचे २ पॉझिटिव्ह आहेत,वाडयात वाणी आळीत एक पॉझिटिव्ह आहे. एकूण आज १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या सर्व भागातील गाव किंवा पाडे प्रतिबंधित केले जाणार असल्याचे माहिती माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय बुरपूले यांनी दिली.पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मिशन बिगेन अगेन या राज्य सरकारच्या संकल्पनेनंतर सर्वत्र बाजारपेठेत गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोना आता ग्रामीण भागात हातपाय पसरताना दिसतोय.