कोनगांव येथे भामट्याने भाजीपाला विक्रेत्याचे २५ हजार रुपये लांबवले

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या भाजीपाला विक्रेत्यास एका भामट्याने एटीएममधून पैसे काढण्यास मदत करतो असे सांगून

 भिवंडी: भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या भाजीपाला विक्रेत्यास एका भामट्याने एटीएममधून पैसे काढण्यास मदत करतो असे सांगून भामट्याने हात चलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून २५ हजार रुपये लांबवल्याची घटना बुधवारी घडली आहे.असाच प्रकार आठ दिवसांपूर्वी याच एटीएमवर घडलेला असताना पुन्हा अशी घटना घडल्याने एटीएमधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

एटीएम धारक मोहम्मद सिराज सिद्दीकी हा युनियन बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता.तो पैसे काढीत असताना त्याला पैसे निघाले नाहीत त्यावेळी अज्ञात भामट्याने त्याला पैसे काढून देतो असे सांगून एटीएम हातात घेऊन त्याने  मशीनमध्ये टाकले व पैसे निघत नसल्याचे भासवून त्याचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून बनावट एटीएम कार्ड त्या भाजीपाला विक्रेत्यास दिले तो निघून गेल्यावर भामट्याने त्याच्या एटीएममधून २५ हजार काढून तो फरार झाला.बँक खात्यातून २५ हजार रुपये काढल्याचा एसएमएस मोबाईलवर येताच आपली फसगत झाल्याचे मो.सिराज याच्या लक्षात येताच त्याने कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक नरेंद्र गिरासे करीत आहेत.