कल्याण डोंबिवलीतील सर्व २७ गावे वगळण्यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चा आग्रही

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून सर्वच्या सर्व २७ गावे वगळण्यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चा आग्रही असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शासनाशी संबंधित अतिमहत्त्वाच्या मान्यवरांना पत्र

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून सर्वच्या सर्व २७ गावे वगळण्यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चा आग्रही असून याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह शासनाशी संबंधित अतिमहत्त्वाच्या मान्यवरांना पत्र दिले आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन काळात १४ मार्च २०२० रोजी विधान परिषदेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले निवेदन व १७ मार्च २०२९ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार तसेच विभागीय कोकण आयुक्त यांनी दिलेल्या अभिप्रायावरून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावांपैकी फक्त १८ गावे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून वगळून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. मात्र अजूनही याबाबत राज्यपालांच्या मान्यतेची आधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्यामुळे या २७ गावांपैकी उर्वरित ९ गावे सुद्धा वगळण्याची मागणी येथील नागरिकांची आहे. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून सर्वच्या सर्व २७ गावे वगळण्यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चाने मुख्यमंत्र्यांसह शासनाशी संबंधित अतिमहत्त्वाच्या लोकांना याबाबतचे पत्र दिले असल्याची माहिती गजानन पाटील यांनी दिली.