पोलीस दलातील जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू

  • पोलीस दलात कार्यररत असलेले जुळे भाऊ दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांना कोरोनाची लागण झाली होती. दिलीप घोडके हे उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते. आणि जयसिंग घोडके हे अंबरनाथमधील पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते दोघांचा मृत्यू आठवड्याच्या फरकाने झाला आहे.

अंबरनाथ – राज्यात कोरोनाने विक्राळ रुप धारण केले आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. या कोरोना काळात पोलीस कोरोना योद्ध्यांच्या भूमिकेच चोख कर्तव्य बजावत आहेत. आहोरात्र कर्तव्य करताना पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याने जीव गमवावा लागला आहे. तसेत अनेक अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पालीस दलाक कार्यरत असलेले २ जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. 

पोलीस दलात कार्यररत असलेले जुळे भाऊ दिलीप रामचंद्र घोडके आणि जयसिंग रामचंद्र घोडके यांना कोरोनाची लागण झाली होती. दिलीप घोडके हे उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात हवालदार होते. आणि जयसिंग घोडके हे अंबरनाथमधील पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार होते दोघांचा मृत्यू आठवड्याच्या फरकाने झाला आहे. 

दिलीप घोडके यांचा २० जुलैरोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच जयसिंग घोडके यांचा मृत्यू २८ जुलैला झाला. या दोघा भावांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. दोघेजण सोबतच पोलीस दलात भरती झाले. आणि सोबतच ट्रेनिंगही पुर्ण केले होते. राज्यात ८ हजार ९५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर कोरोनामुळे ९८ पोलीसांना आपला जीव गमवावा लागला आहे. ६हजार ९६२ पोलीसांनी कोरोनावर मात केली आहे.