तिकीटाच्या वादातून तरुणांचा टीसीवर हल्ला, टीसीच्या डोक्याला दुखापत, या दोन तरुणांना अटक

तिकीट आणि ओळखपत्र तपासताना झालेल्या वादातून दोन तरुणांनी एका टीसीवर हल्ला केल्याची घटना घडलीय. तिकीट तपासनीसाने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांकडे तिकीट आणि ओळखपत्र यांची मागणी केली. त्यावरून या तरुणांनी टीसीला उलट उत्तर देत तिकीट आणि ओळखपत्र द्यायला नकार दिला. त्यावरून वादाची ठिणगी पडली.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सध्या सर्वसामान्यांसाठी बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर रेल्वेतील प्रवाशांचं ओळखपत्र आणि तिकीट तपासण्याचं काम तिकट तपासनीस (टीसी) करत असतात. मात्र ठाणे जिल्ह्यातील दिवा स्थानकात टीसी आणि तरुणांमध्ये झालेल्या वादाचं पर्यवसान हल्ल्यात झालं.

    तिकीट आणि ओळखपत्र तपासताना झालेल्या वादातून दोन तरुणांनी एका टीसीवर हल्ला केल्याची घटना घडलीय. तिकीट तपासनीसाने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांकडे तिकीट आणि ओळखपत्र यांची मागणी केली. त्यावरून या तरुणांनी टीसीला उलट उत्तर देत तिकीट आणि ओळखपत्र द्यायला नकार दिला. त्यावरून वादाची ठिणगी पडली.

    टीसी आणि दोन तरुण यांच्यातील वाद वाढत गेला आणि या दोन तरुणांनी टीसीवर थेट हल्लाच चढवला. या हल्ल्यात टीसीच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन तरुणांना अटक करण्यात आलीय.

    सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, या कलमांतर्गत दोन तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कुणाल संजय शिंदे (वय २० वर्षे) आणि हर्षल गिरीधर भगत ( वय २५ वर्षे) अशी या दोन तरुणांची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.