भिवंडीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा बुडून मृत्यू

भिवंडी : भिवंडीतील (Bhiwandi) कामवारी नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहबाज अन्सारी (वय २४) आणि शाह आलम अन्सारी असे मृत दोघा भावांची नावे आहेत. हे दोघे मुंबई येथून नुकतेच मिल्लत नगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते ते सायंकाळी सुमारास हे दोघे भाऊ (Two brothers) कामवारी नदीत चाविन्द्रा पेट्रोल पंपा मागे आपल्या आईसोबत मासे पकडण्यासाठी (fishing) गेले होते.

त्यावेळी एका भावाचा पाय घसरुन तो नदीच्या प्रवाहात वाहत जाऊ लागला. भावाला बुडताना पाहून दुसऱ्या भावाने आईजवळील दुप्पटा घेतला. बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी दुसरा भाऊ पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो ही बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दोन्ही मुलांना बुडताना पाहून आईने रस्त्याच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. ही वार्ता मिल्लत नगर भागात पसरल्यानंतर स्थानिक नगरसेवक इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास पाचारण केले .

दरम्यान, स्थानिक युवकांनी पाण्यात उतरुन शोध घेत साडे सात वाजताच्या सुमारास शाह आलम याचा मृतदेह बाहेर काढला. तर शहबाज अन्सारीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात असून अंधार झाल्याने त्यामध्ये अडथळा आला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह परिसरावर शोककळा पसरली आहे