भिवंडीत ट्रकच्या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी 

भिवंडी : बुलढाणा येथील मुळ गावाहून दोघे चुलत भाऊ मोटारसायकलवरून ठाणे ,वागळे इस्टेट ,इंदिरानगर येथील घरी जात असताना उजव्या साईडने चालणाऱ्या ट्रकचालकाने भरधाव वेगातील ट्रक  (क्र.एमएच – ४३ – वाय -६६७८ ) अचानकपणे डाव्या बाजूस घेतल्याने ट्रकची धडक पाठीमागून दुचाकीला बसल्याने झालेल्या अपघातात दोघे भाऊ रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावरील हायवेदिवा गावाच्या हद्दीतील बॉम्बे धाब्यासमोर काल रात्री घडली आहे.या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून त्याचा शोध नारपोली पोलीस घेत आहेत.या अपघातात लहू भगवान प्रधान (३१ )याच्या उजव्या हाताला,उजव्या कानाला,गुडघ्याला व खांद्यास फ्रॅक्चर झाला आहे तर त्याचा चुलत भाऊ महेंद्र सुरेश प्रधान (३५)याच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे.या दोघांना उपचारासाठी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.या अपघाताच्या घटनेची नारपोली पोलीस ठाण्यात केली असून पुढील तपास पोलीस हवालदार जालिंदर चव्हाण करीत आहेत.