पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २०१ नव्या रुग्णांची भर

पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हीड-१ च्या रुग्णांची संख्या आता ३०६२ वर पोहचली असून आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर

 पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २०१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातली कोव्हीड-१ च्या रुग्णांची संख्या आता ३०६२ वर पोहचली असून आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १७३१ जण कोरोनामुक्त झालेआहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२२५ रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण २१ हजार ५०३ इतक्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये सद्यस्थितीत १५२ इतकी प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तर पालघर तालुक्यात नगरपरिषद, पालघर, बोईसर, तारापूर, दातीवरे, काटाळे, सफाळे , डहाणू तालुक्यात नगरपरिषद, डहाणू, नरपड, रानशेत, तलासरी तालुक्यात इंडिया कॉलोनी, जव्हार तालुक्यात नगरपरिषद, जव्हार, केळघर, मोखाडा तालुक्यात मोखाडा , साखरी, वसई ग्रामीण मध्ये अर्नाळा, कोमंड, वाचळी, कळंब, रानगाव, चंद्रपाडा, विक्रमगड मध्ये सुखसाळे, डोल्हारी,
वाडा तालुक्यात नगरपंचायत, वाडा, किरवली, भावेघर, खरीवली, खाणीवली, चांभळेब हे हॉटस्पॉट असलेले भाग आहेत.