कल्याण डोंबिवलीत २१२ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने आज एकाच दिवशी द्विशतक पार केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला

 कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या संख्येने आज एकाच दिवशी द्विशतक पार केले आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २१२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील एकूण कोरोना २७७९ झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी रुग्णांची नोंद होणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही ठाणे जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

आज झालेल्या दोन मृत्युंमध्ये डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड येथील ८१ वर्षीय पुरुष आणि कल्याण पूर्वेतील एफ केबिन येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण २७७९ रुग्णांपैकी १४७३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर १२३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आजच्या या द्विशतक आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महानगरपालिका कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.