hemant nagrale

मीरा भाईंदर पालिकेचे(Meera Bhayander Corporation) कार्यकारी अभियंता दीपक खांबीत(Firing On Executive Engineer Dipak Khambit) यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींना मीरा भाईंदर व मुंबई पोलीसांनी अटक(Arrest) केली आहे.

    मीरा भाईंदर : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या(Meera Bhayandar Mumnicipal Corporation) कार्यकारी अभियंता दीपक खांबीत(Firing On Executive Engineer Dipak Khambit) यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करून पसार झालेल्या आरोपींना मीरा भाईंदर व मुंबई पोलीसांनी अटक(Arrest) केली आहे.धक्कादायक बाब म्हणजे ही हत्येची सुपारी पालिकेतील दोन कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख यांनी दिली, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale Press Conference)यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

    मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता पदावर दीपक खांबित हे कार्यरत आहेत.२९ सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी ६.१० वाजता ते कामावरून घरी परतत असताना बोरिवली येथील संजय गांधी उद्यानाजवळ दोन दुचाकीस्वार युवकांनी त्यांच्यावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला केला होता.यात खांबित हे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली. मुंबईसह मीरा भाईंदर पोलिसांनी एकूण १० पथके तयार करून तपासासाठी रवाना केले होते.१०० पेक्षा अधिक जागेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यामध्ये मीरा भाईंदर गुन्हे शाखेचे उपायुक्त महेश पाटील यांच्या टीमने उत्तर प्रदेश मधील भदोई जिल्ह्यातून अमित सिन्हा याला अटक केली आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्यानंतर मुंबई पोलिसांनी कसून तपास केला असता यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली की मीरा भाईंदर महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण मोहिते व यशवंत देशमुख यांनी २० लाखाची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले.आतापर्यंत एकूण पाच जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

    मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये पदोन्नती सध्या जोरदार सुरू आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच घेताना अटक करण्यात आलेले अधिकारी यांना पदोन्नती देण्याचे काम सध्या सुरू आहे.अनेक वर्षांपासून आरोपी श्रीकृष्ण मोहिते मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.मागील अनेक वर्षपासून एकाच पदावर आहे पदोन्नती देण्यास अडथळा करत असल्याने मोहिते हे नाराज होते.त्याचमुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची हत्या करण्यासाठी २० लाखाची सुपारी दिली गेली, यामध्ये सुरुवातीला १० लाख रुपये देण्यात आले आणि काम झाल्यानंतर पुढील रक्कम १० लाख देण्यात येणार होते अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.