वाडा तालुक्यातील आरोग्य सेवेतील २ रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह – संपर्कातील १२ जण क्वारंटाईन

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढलल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुले यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली वसई

 वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढलल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपुले यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेली वसई येथे आशा वर्कर म्हणून काम करणारी ३२ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णाच्या घरी पाहुणे गेलेले मोज आणि चिचघर येथील  लोक आणि रुग्णाचेे नातेवाईक असे एकूण १२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे . त्याच बरोबर अजून एक तालुक्यात एका गावातील स्टाफ नर्सला कोरोना लागण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यात रहिवासी असलेले दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढलेले आहेत.