मुरबाडमध्ये सापडले कोरोनाचे आणखी दोन रुग्ण

मुरबाड: आज मुरबाडमध्ये कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सहा इतकी झाली आहे. शुक्रवारी मारहाणीतील जखमी कोरोनाग्रस्त

 मुरबाड: आज मुरबाडमध्ये कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या मुरबाड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सहा इतकी झाली आहे. शुक्रवारी मारहाणीतील जखमी कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्यानंतर या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पोलिसांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असतांना मुरबाड शहरात या आधी क्वारंटाईन केलेल्यांपैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मुरबाड तालुक्यातील व शहरातील असंख्य नागरिकांची कोरोनाबाधित क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने दररोज ये जा सुरू आहे, मात्र याबाबतीत कोणतीही काळजी आणि खबरदारी घेतली जात नसल्याने मुरबाड तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या तालुक्यात २३३ इतके जण होम क्वारंटाईन आहेत.