Motorcycle accident
प्रतीकात्मक फोटो

सदर डॉक्टर रोजच्या प्रमाणे आपल्या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी स्कुटरवरून निघाला होता.त्यावेळी तो प्रितेश कंपाऊंड समोर असताना समोरून भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने डॉक्टर शमीम यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भिवंडी : स्कुटरवरून आपल्या वळपाडा येथील माऊली क्लिनिकमध्ये जात असताना दापोडे हद्दीतील प्रितेश कंपाऊंडसमोर अज्ञात वाहनाने (Two-wheeler) धडक (Bhiwandi vehicle Accident) दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार डॉक्टर (doctor) जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली आहे. शमीम मोहम्मद बशीर मोमीन (५३ रा.भुसार मोहल्ला ,गौरीपाडा) असे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या डॉक्टरचे नांव आहे. सदर डॉक्टर रोजच्या प्रमाणे आपल्या क्लिनिकमध्ये जाण्यासाठी स्कुटरवरून निघाला होता.त्यावेळी तो प्रितेश कंपाऊंड समोर असताना समोरून भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने डॉक्टर शमीम यांच्या डोक्यातील मेंदू बाहेर आल्याने त्यांचा जगीच मृत्यू झाला आहे. या अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जि.बी.गणेशकर करीत आहेत.