ambernath man killing child

अवघ्या १२ ते १३ वर्षांच्या दोन लहान मुलांचे सगळे कपडे काढून त्यांना अमानुषपणे मारहाण(man beating naked children) करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे. (man beats two children in ambernath)

    अंबरनाथ: अंबरनाथमध्ये(ambernath) एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अवघ्या १२ ते १३ वर्षांच्या दोन लहान मुलांचे सगळे कपडे काढून त्यांना अमानुषपणे मारहाण(man beating naked children) करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अंबरनाथ शहरात संतापाची लाट उसळली आहे. (man beats two children in ambernath)

    अंबरनाथच्या पश्चिम भागातील चिंचपाडा खदान परिसरात हा प्रकार घडला आहे.  चाचू नावाच्या एका विक्षिप्त माणसाने एका लहान मुलाला काठीने अमानुषपणे मारहाण केली आहे. लाथाबुक्क्या, काठीने या मुलाच्या पायावर, हातावर, डोक्यात, पोटात, इतकंच नव्हे तर गुप्तांगावरही त्याने मारहाण केली आहे. मुलगा रडत असल्याचे पाहूनही या मुलाला कपडे काढायला लावत नग्न अवस्थेत तो राहत असलेल्या परिसरापर्यंत चाचूने चालायला लावलं.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाचूचे खरे नाव बाबू गुंडे असं आहे. त्याने मुलींची छेड काढत असल्याच्या संशयावरून या मुलांना मारहाण केली आहे. या मुलांना इतकी अमानुष मारहाण होऊनही पोलिसांनी बाबू गुंडे उर्फ चाचू विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही.