धबधब्यावर गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आंबेळे गावातील काही तरुण खोपिवली येथील धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यातील दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, मुरबाड तालुक्यातील आंबेळे (गडगे) गावचे सहा तरुण गुरुवारी दुपारच्या सुमारास खोपवली येथील चोंडीच्या धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. चोंडीचा हा धबधबा धोकादायक म्हणून ओळखला जातो.

पर्यटनासाठी गेलेल्या ६ तरुणांपैकी धबधब्यामध्ये अंघोळी दरम्यान दोन तरुणांना आपला जीव गमावला लागला आहे. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुरबाड पोलिस, अग्निशमन दल व एन. डी. आर. एफ. ची टीम ही घटनास्थळी दाखल होऊन या दोघांचे मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. यातील उमेश पुंडलिक बोटकुंडले वय (२१)याचा मृतदेह सापडला आहे तर कार्तिक गडगे (वय १५ वर्षे) याचा शोध सुरू आहे.