उद्धव ठाकरे यांचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत – किरीट सोमय्या

ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे.

    ठाणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते भाई लोकांची मदत घेत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र, हे मंत्री कोण आहेत? आणि कोणत्या भाईंची मदत घेत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

    किरीट सोमय्या आज ठाणे महापालिकेत आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते. आयुक्ताशीं भेटण्यापूर्वी मीडियाशी बोलताना सोमय्या यांनी हा गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारला ठिकाण्यावर आणण्याचे काम मी करत आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांची झोपमोड झाली आहे. काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहे, असं सांगतानाच वाशीममध्ये माझ्यावर जो हल्ला झाला त्यात भावना गवळींचे काही भाई लोक होते. तसं रिपोर्टमध्येही आलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारच्या गृह मंत्र्यांनी मला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.