उद्योग मराठी माणसाचा

शेफ ऑन ड्युटीचे अजीव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

वसई  : उद्योग मराठी माणसाचा प्रणीत मराठी तरुण धनेश माने याच्या शेफ ऑन ड्युटी या हॉटेलचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे संघटक सचीव तथा जेष्ठ सभापती अजीव पाटील यांच्या हस्ते झाले.

नालासोपारा पश्‍चिमेकडील यशवंत गौरव नगरातील साई हाईट्समध्ये सायंकाळी ५ वाजता या शेफ ऑन ड्युटीला सुरवात झाली.यावेळी महापालिकेचे माजी सभापती निलेश देशमुख,किशोर पाटील, अतुल साळुंखे,माजी नगरसेवक हार्दीक राऊत,युवा विकास आघाडी नालासोपारा पश्‍चिम विभाग अध्यक्ष नवीन वाघचौडे,प्रभाग क्र.५७ च्या महिला आघाडी सचीव रुचिदा मानें,माजी सैनिक प्रकाश रजपूत यांच्या विरपत्नी निता रजपूत आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोना संकटाने मराठी माणसाची नोकरी हिरावून नेली असली तरी उद्योग-धंद्याचा मार्ग दाखवल्याचे दिसून येत आहे.अनेक जणांनी रस्त्यावर भाजी-पाला विकण्याचे धाडस केले.तर काहींनी आपला छोटा-मोठा व्यवसाय सुरु केला आहे.तरुण पिढीही स्वतःच्या पायावर उभी राहून व्यवसायाकडे वळु लागली आहे.धनेश माने हा त्यापैकी एक आहे.हे पाहून समाधान वाटते.अशा शुभेच्छा अजीव पाटील यांनी यावेळी दिल्या.